*कोकण Express*
*देवबाग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ५५ टक्के मतदान…*
तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये रिक्त पदासाठी आज निवडणूक पार पडली. यात ६३९ पैकी ३५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ५५ टक्के मतदान झाले. मतमोजणी उद्या सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय येथे होणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील एका रिक्त जागेसाठी रमेश कद्रेकर व अपर्णा धुरी यांच्यात लढत झाली. आज या रिक्त जागेसाठी मतदान पार पडले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. यात ६३९ मतदारांपैकी ३५० जणांनी मतदान केले. उमेदवार रमेश कद्रेकर व अपर्णा धुरी यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. उद्या ता. २२ सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असल्याचे तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पष्ट केले.