*कोकण Express*
*ग्रा पं पोटनिवडणुक मतदान शांततेत पार…!*
*कणकवलीीः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कळसुली, लोरे नंबर 1 व हळवल या तीन ग्रामपंचायतच्या प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कळसुली मध्ये 652 पैकी 399 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तेथे 61.19 टक्के मतदान झाले लोरे नंबर 1मध्ये 537 पैकी 335 मतदारांनी मतदान करत तेथे 62.38 टक्के मतदान झाले तर हळवल मध्ये 564 पैकी 420 मतदारांनी मतदान करत तेथे 74.46 टक्के मतदान झाले यातील कळसुली तील एका जावेसाठी 18 जानेवारी ला मतदान होणार असल्याने तेथील मतमोजणी राखून ठेवण्यात येणार आहे तर लोरे नंबर 1 व हळवल मधील निवडणूक ची बुधवार 22 डिसेंबर ला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे.