*कोकण Express*
*एस.एस.हायस्कूल समोर, कणकवली कॉलेज रोडवर पोलिसांची नेमणूक करावी…!*
*राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पोलीस निरीक्षकांकडे मागणी…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली एस.एस.हायस्कूलसमोरील अंडरपास, विद्यामंदिर व कणकवली कॉलेज समोरच्या रोडवर रोडरोमिओचा वावर वाढला असून अल्पवयीन मुले बिनधास्तपणे वाहने चालवत आहेत. त्यातच ही मुले याठिकाणी थांबवून दंगा-मस्ती करत आहेत. त्याचा त्रास नागरिक, मुली, लहान मुलांना होत आहे. त्यामुळे याठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री पाटील यांना सादर केले.
यावेळी सागर वारंग, सामाजिक व न्याय विभागाचे अजय जाधव, नयन गावडे, समीर जाधव हे उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस.एस.हायस्कूलसमोर अंडरपास, विद्यामंदिर व कणकवली कॉलेज रोडवर वाहनांची वर्दळ कायम असते. याशिवाय रोडरोमिओचा वावर असतो आणि अल्पवयीन मुले दंगा-मस्ती करत असतात. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक, मुली, लहान मुलांना होत आहे. तरी याची तात्काळ दखल घेऊन याठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी, अशी विनंती राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.