*कोकण Express*
*’सिंधुदुर्गातील आजची कविता’ संग्रहाचे कवी प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते प्रकाशन*
*सिंधुदुर्गातील नव्या पिढीतील गुणवान कवींचा प्रातिनिधीक संग्रह*
*’कवितारती’चे संपादक प्रा.डॉ.आशुतोष पाटील, समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची पाठराखण*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
अलीकडल्या काळात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या स्तरातील कवी उत्तम कविता लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत यातील निवडक गुणवान कवींच्या कविता संकलित करून ‘सिंधुदुर्गातील आजची कविता’ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. याचे प्रकाशन सावंतवाडी येथे समाज साहित्य संमेलनात नामवंत कवी, कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या संग्रहाला कविता-रतीचे संपादक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.आशुतोष पाटील यांची प्रस्तावना तर नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ रणधीर शिंदे यांची पाठराखण लाभली आहे.
समाज साहित्य संमेलनात ‘समाज साहित्य स्मरणिका 2021’ या ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक साहित्य अकादमीचे सल्लागार सदस्य डॉ. राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी ‘सिंधुदुर्गातील आजची कविता’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रा बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज साहित्य संघटनेचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार विजेत्या कष्टकऱ्यांच्या नेत्या उल्काताई महाजन, काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कादंबरी पुरस्कार विजेते कृष्णात खोत, कवी समीक्षक प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर, समाज साहित्य संघटनेचे मार्गदर्शक कवी अजय कांडर, संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे विश्वस्त प्रा. वैभव साटम, प्रा. नीलम यादव, कार्यवाह सरिता पवार, उपाध्यक्ष प्रा. मनीषा पाटील, कोषाध्यक्ष प्रमिता तांबे, सदस्य ऍड मेघना सावंत, प्रा.प्रियदर्शनी पारकर, निमंत्रित सदस्य विजय सावंत, धरणग्रस्तांचे नेते संपत देसाई, सत्यशोधक संघटनेचे नेते अंकुश कदम, महेश पेडणेकर, महेश परुळेकर, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
‘सिंधुदुर्गातील आजची कविता’ हा प्रातिनिधीक कवितासंग्रह अजय कांडर, मधुकर मातोंडकर यांच्या संकल्पनेतून प्रकाशित करण्यात आला असून त्याचे संपादन प्रा वैभव साटम यांनी केले आहे. तर त्यांना रमेश सावंत, सरिता पवार, सफरली इसफ यांचे संपादन सहकार्य लाभले आहे.या संग्रहात सिंधुदुर्गातील कवी रमेश सावंत,
नीलम यादव, सफरआली इसफ,
सरिता पवार,सूर्यकांत चव्हाण, मनीषा ऍड. मेघना सावंत, नामदेव गवळी,प्रमिता तांबे, आनंदहरी, स्नेहा राणे, रुजारिओ पिंटो,सुरेश कुराडे,मधुकर मातोंडकर, विजय सावंत, राजेश कदम,सिद्धार्थ तांबे,वैभव साटम,ऍड.प्राजक्ता शिंदे,रुपाली दळवी,किशोर वालावलकर आदींच्या कवितांचा समावेश आहे.