*कोकण Express*
*कर्नाटकातील घटनेचा मराठा समाजातर्फे निषेध…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कर्नाटक राज्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची समाजकटंकांनी विटंबना केली. या कृतीचा आज कणकवली तालुका मराठा समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. शहरातील मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तेली आळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी एकत्र आले होते.
यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत कर्नाटकातील समाज कंटकांचा निषेध करण्यात आला. तसेच असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मराठा समाजाचे भाई परब, महेंद्र सांब्रेकर, सुशील सावंत, बच्चू प्रभुगांवकर, संदीप चव्हाण, सुशांत दळवी, समीर परब, बबलू सावंत स्वप्नील चिंदरकर, संतोष पुजारे, आबा सावंत यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.