सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ. स्नेहा केरकर तर उपाध्यक्ष पदी सौ. श्वेता हुले यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ. स्नेहा केरकर तर उपाध्यक्ष पदी सौ. श्वेता हुले यांची निवड

 *कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ. स्नेहा केरकर तर उपाध्यक्ष पदी सौ. श्वेता हुले यांची निवड*

*मालवण ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक विविध उत्पादक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी सर्व संचालक मंडळाच्या एकमुखी निर्णयानुसार संस्थेच्या जिल्हाध्यक्ष पदी तारकर्लीच्या धडाडीच्या सरपंच व मच्छीमार महिला नेत्या सौ.स्नेहा केरकर यांची तर उपाध्यक्ष पदी वेंगुरल्याच्या महिला मच्छीमार नेत्या सौ. श्वेता हुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
[19/12, 4:49 pm] ChandraShekhar Uaparkae: यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रशांत शिरसेकर, संस्थेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर उपरकर, श्री.लक्ष्मण तारी,सौ.प्रियांका तारी,उष:कला केलूस्कर,स्वप्नाली तारी, नीता कोचरेकर,विशाखा करवडकर,मानसी मालंडकर, संध्या गोवेकर ,अपर्णा धुरी ,वैभवी चौकेकर,राजलक्ष्मी शिरोडकर, सारिका मोरजे ,डॉ. जितेंद्र केरकर वगैरे मान्यवर उपस्थित होते.राज्यात 3650 महिला सदस्य असलेली हि एकमेव सहकारी संस्था असून संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.परंतु बिनविरोध निवडिमुळे संस्थेचा पैसा व श्रम वाचले आहेत.
यावेळी श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत केलेल्या कामगिरिचे विश्लेषण केले .तसेच केंद्र सरकारच्या मच्छीमार लोकांसाठी आलेल्या मत्स्यसम्पदा योजना,कांदळवन योजना ,नीलक्रांति योजना यांचा लाभ सभासदाना मिळवून द्यावा आणि संस्था प्रगतिपथावर आणावी असे आवाहन केले. सौ श्वेता हुले, व सौ. प्रियांका तारी यांनी आपण सुरु केलेल्या कांदळवन सफारी आणि कांदळवन रोपवाटिका प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली . संस्थेच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी मच्छिमार महिलांच्या न्याय्य मागणयां
साठी संस्थेने वेळोवेळी काढलेले मोर्चे,धरणे आंदोलने,पत्रव्यवहार, बैठका, धान्यवाटप यांची माहिती दिली. व यापुढेहि आपण मच्छीमार महिलांच्या समस्या सोडविणयासाठी जोमाने कार्यरत राहणार असल्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!