बेकायदेशीर रित्या वाहनाला आडवून रेपो करणाऱ्याला  ताबडतोब खंडणी चा गुन्हा दाखल

बेकायदेशीर रित्या वाहनाला आडवून रेपो करणाऱ्याला  ताबडतोब खंडणी चा गुन्हा दाखल

*कोकण  Express*

*बेकायदेशीर रित्या वाहनाला आडवून रेपो करणाऱ्याला  ताबडतोब खंडणी चा गुन्हा दाखल*

*गुन्हेगारावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून बँक अधिकाऱ्यांना धरणााार जबाबदार*

*पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश*

पुण्यातील एका बस व्यावसायिके ची गाडी Finance कंपनी च्या रेपो agency ने जबरदस्तीने बेकायदेशीर पद्धतीने वाहन जमा केले होते,  सदर बाबतीत पुणे बस अँड कार ऑनर असोसिएशनने पाठ पुरवठा करून पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश  साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी चा गुन्हा दाखल करून घेतला, त्या बद्दल पुणे आणि पिंपरी चिंचवड असोसिएशन च्या वतीने साहेबांच्या पुष्पागुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,  त्यावेळी मनसे वाहतुक सेना अध्यक्ष श्री संजय नाईक साहेब,  मनसे शहर अध्यक्ष सचिन जी चिखले, श्री चिंतामणी किशोर, श्री  शिवाजी मते सुशांत  साळवी, बससपा वळसंगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  या वेळी श्री कृष्ण प्रकाश साहेबानी दीड तास चर्चा करून संपूर्ण विषय समजून घेत तातडीने सर्व टीम ला निर्देश दिले की बेकायदेशीर रित्या जर कोणी वाहनाला अडवत असेल किंवा रेपो करीत असेल तर त्यांच्या वर ताबडतोब खंडणी चा गुन्हा दाखल करावा,  तसेच इथून पुढे अश्या लोकांवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून बँक अधिकाऱ्यांना पण जबाबदार धरण्यासाठी सूचना दिल्या. पुणे संघटनेच्या वतीने किरण देसाई  पिंपरीचिंचवड संघटनेच्या वतीने श्री दीपक कालापुरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!