*कोकण Express*
*संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे स्वाभिमानच्या गुंडांचा व त्यांच्या नेत्यांचा हात; खास.विनायक राऊत यांचा गंभीर आरोप…!*
*जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टकिलरांचा शोध पोलिसांनी घ्यावा…!*
*खास.राऊत यांनी केली जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
करंजेचे माजी सरपंच व मजूर संस्थेचे संचालक आणि सतीश सावंत यांचे खंदे समर्थक संतोष परब याच्यावर केलेल्या जीवघेणा हल्ल्यामागे स्वाभिमानच्या गुंडाचा व त्यांच्या नेत्यांचा हात आहे.स्वतः वाईट कृत्य करायचं आणि दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचं हि बदमाशगिरी आम.नितेश राणे यांच्या रक्तातच भिनलेली आहे. आम राणे यांनी या प्रकाराबाबत दिलेली प्रतिक्रिया म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला खास.विनायक राऊत यांनी आम.राणे यांना लगावला. तसेच या जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टकिलर आले असून त्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना केल्याचे खास राऊत यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हाबँकेची निवडणूक सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढ्तवत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्ध्यांना आपला पराभव दिसू लागल्याने त्याच्याकडून जिल्ह्यात राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. या राजकीय दहशतीतूनच संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्याखोरांना आम्ही सोडणार नाही. असा इशारा देतानाच या राजकीय दहशतीचा बिमोड करण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि ती वेळीच मोडून काढू.या हल्ल्यामुळे पुन्हा जिल्ह्यातील शांततेचे वातावरण बिघडले आहे. भविष्यात हि हल्ल्याची प्रवृत्ती मोडीत काढणार असल्याचे स्पष्ट केले.
शिवसैनिकावर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर ते खपवून घेतले जणार नाहीत. हल्लेखोरांना जशास तसे उत्तर शिवसैनिक दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत, असा इशारा खास राऊत यांनी विरोधकांना दिला. दरम्यान शिवसैनिकामध्ये पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचे बॅंकिंग मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात खतखद आहे. याबाबत खास राऊत यांना प्रश्न विचारला असता शिवसैनिकांच्या पाठीशी नेतृत्व खंबीर पणे उभे असल्याचे त्यांनी सांगत या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
तदपूर्वी खास राऊत यांनी हल्यात जखमी झालेल्या श्री.परब यांची भेट घेत त्यांच्या तब्येतेची विचारपूस करत घडल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. कुटुंबियांना याप्रसंगातून सावरण्यासाठी धीर दिला त्यानंतर संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्याच्या घटने ठिकाणी जात पाहणी केली.
यावेळी तालुका प्रमुख शैलेश भोगले,नगरसेवक कन्हैया पारकर,सचिन सावंत,संजय पारकर,अमित मयेकर,श्री.सावंत आदी उपस्थित होते.