*कोकण Express*
*निगुडे सरपंच समीर गावडे यांनी उपप्रादेशिक परिवहन सिंधुदुर्ग अधिकारी श्री नंदकिशोर काळे निगुडे ओव्हरलोड वाहतुकीबाबत कारवाईसाठी घेतली भेट*
*बांदा ः प्रतिनिधी*
गाव मौजे शेरले- निगुडे -सोनुरली रस्त्यावरून ओव्हरलोड खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याबाबत शेरले- निगुडे -सोनुरली रस्त्यावरून व्येते सोनुरली गावातील खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात निगुडे गावातून होत आहे तसेच निगुडे रोणापाल या नवीन रस्त्यावरूनही वाहतूक होत आहे तसेच दोन्ही रस्ते अरुंद असल्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला अडथळा निर्माण होऊन वारंवार अपघात होतात तसेच रस्त्याची साईड पट्टी व पुलं बसलेली आहेत सदर वाहनांना पर्यायी मार्ग खनिज कंपनीने दिला असता त्याचा वापर न करता डिझेल व अंतर कमी करण्याच्या हेतूने गावातून वाहतूक करतात तसेच काही वाहतूकदार कंपनीशी निगडित नाही आहेत त्यांना रस्त्याचा भाडं द्यावं लागतं त्यामुळे सदर वाहतूकदार निगुडे गावातून ओव्हरलोड वाहतूक करतात त्यामुळे महोदय आपण स्वतः निगुडे सोनुर्ली रस्त्याची पाहणी करावी त्याच प्रमाणे रात्री १२:०० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत विनापरवाना खनिज वाहतूक होते त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्यामुळे ग्रामस्थांना शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत तसेच याच रस्त्यावरून शाळेच्या स्कूल बस येतात जातात त्यामुळे या डंपर चालकांचा या धोका आहे तसेच सदर कंपनी व खाण व्यवस्थापकांना वारंवार सूचना देऊनही यावर कोणतीही कल्पना वाहतूकदारांना दिली जात नाही तसेच रस्त्यावरची धूळ ग्रामस्थांच्या घरांमध्ये जात आहे त्यामुळे गावातून वाहणारी खनिज वाहतूक बंद करावी तसेच भरारी पथकास तपासणीचे आदेश देण्यात यावे व कारवाई करावी ही विनंती ग्रामस्थांच्या लोकप्रतिनिधींनी सदर वाहतुकीबद्दल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यात आपले कार्यालय जबाबदार राहतील असा इशाराही सरपंच श्री गावडे यांनी दिला यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांनी निगुडे सरपंच यांना आश्वासन दिले की दर तीन दिवसांनी आमचे भरारी पथक याठिकाणी तपासणीसाठी येणार आहे आणि जे वाहतूकदार आम्हाला रस्त्यात मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू आत्ताच ओव्हर लोड वाहतुकीबद्दल निर्णय झाला आहे की दुप्पटीने दंड आकारण्यात संदर्भात त्यामुळे यापुढे आम्ही योग्य तो बंदोबस्त करू असं आश्वासनही श्री काळे यांनी दिले