*कोकण Express*
*दत्त जयंतीचे औचित्य साधत आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या सोबत दोडामार्ग येथील श्री राष्ट्रोळी दत्त मंदिरात घेतले दर्शन..*
*दोडामार्ग ः लवू परब*
दोडामार्ग निवडणुकीला 2 दिवस उरले असून, शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली आहे. विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेने मोर्चे बांधणी केली असून, आमदार दीपक केसरकर यांनी देखील या ठिकाणी लक्ष घातले आहे. आज दत्त जयंतीचे औचित्य साधत आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या सोबत दोडामार्ग येथील श्री राष्ट्रोळी दत्त मंदिरात दर्शन घेतले आहे.
यावेळी आमदार दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, दोडामार्ग वासियनी प्रामाणिक, लोकांची कामे करणारे चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत. दोडामार्ग च्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. परंतु, काही कामे मागे राहिलीत, ती कामे देखील लवकरच पूर्ण होतील. केवळ आता 2 दिवस राहिल्याने गोव्यातून टोळधार येतील आणि निवडणूक झाल्यावर गायब होतील. त्यामुळे जनतेने जागृत राहून मतदान करावे.
जनतेने केवळ 5 वर्ष आघाडी सरकारला द्यावीत, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नक्कीच विकास करणार. असे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. यावेळी मेडिकल कॉलेजला केंद्रातील काही मंडळी मुद्दाम विरोध करत असून, स्वतः च्या मेडिकल हॉस्पिटल मधून कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लाखो रुपये उपचारासाठी घेतले असल्याची टीका केसरकर यांनी विरोधकांवर केली आहे.