*कोकण Express*
*वैभववाडीत आ. नितेश राणे यांचा झंझावाती प्रचार; दौऱ्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*न.पं. निवडणुकीत भाजपाची प्रचारात आघाडी*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्येक प्रभागात जावून झंझावाती प्रचार दौरा केला. या दौऱ्यात मतदारांचा आ. नितेश राणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी भाजपा वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती दिलीप रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, जि.प. सदस्य शारदा कांबळे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, सज्जनकाका रावराणे, सुनील भोगले, सुंदरी निकम, किशोर दळवी, बंड्या मांजरेकर, स्वप्नील खानविलकर, मारुती मोहिते प्रकाश पाटील व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या दौऱ्यात उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी प्रभाग क् १ चे उमेदवार स्नेहलता चोरगे, प्रभाग क्र. ४ च्या उमेदवार प्राची तावडे, प्रभाग ६ चे उमेदवार राजन तांबे, प्रभाग ७ चे उमेदवार भालचंद्र रावराणे, प्रभाग ९ चे उमेदवार सुप्रिया तांबे, प्रभाग १० च्या उमेदवार सुंदरी निकम, प्रभाग क्र. ११ च्या उमेदवार यामिनी दळवी, प्रभाग १२ चे उमेदवार विवेक रावराणे, प्रभाग १३ चे उमेदवार संजय सावंत, प्रभाग १४ च्या उमेदवार श्रावणी तांबे, प्रभाग २ चे उमेदवार नेहा माईनकर, प्रभाग १७ च्या उमेदवार सानिका रावराणे आदी उमेदवारांनी प्रचारादरम्यान मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांचे आशीर्वाद घेतले.