*कोकण Express*
*चिंचवली येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटणतर्फे यशस्वीरित्या अभ्यासकीय दौरा संपन्न*
*कासार्डे ः संजय भोसले*
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटणच्या वनस्पतीशास्त्र विभाग व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचवली येथे दि. 13 डिसेंबर 2021 रोजी अभ्यासकीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयातील अध्ययन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास झाला पाहिजे या अनुषंगाने अभ्यास दौर्यांचे आयोजन केले जाते. वर्गा बाहेरील ज्ञान आत्मसात करून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी अभ्यासदौरे महत्त्वाची भुमिका बजावतात.
अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्याचा विकास होतो, स्वयम् अध्ययनाची सवय लागणे, ज्ञान निर्मिती, जिज्ञासू वृत्ती जागृत होणे व वाढ, शोध घेण्याची वृत्ती वाढीस लागते, अध्ययन शैलीचा विकास होऊन त्या संबंधित विषयाबाबतच्या संकल्पना स्पष्ट होतात, एकमेकांना सहाय्य करत शिकणे, स्व:कृतीतून आनंददायी पद्धतीने शिकणे इत्यादी बाबत विकास होतो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक प्रा.वसीम सय्यद, भूगोल विभाग प्रमुख प्रा.प्रकाश शिंदे, विज्ञान शाखा प्रमुख व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सागर इंदप, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रजोत नलावडे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.कविता आमकर, गणितशास्त्र विभाग प्रमुख प्रा.मंगल परब, प्रा.शर्मिन काझी व या अभ्यास दौऱ्यास मुख्य अतिथी व केंद्र बिंदू ठरवेले वनस्पतीशास्त्र तज्ञ मार्गदर्शक मा.प्रा.प्रतिक नाटेकर यांनी या अभ्यासकीय दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना संबंधित विषयवार मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने पश्चिमघाटामध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पती तसेच या भागामध्ये आढळनारे पक्षी, कीटक यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. गावातील प्रगतशील शेतकरी आणि चिंचवली गावचे उपसरपंच मा.श्री.अनिल पेडणेकरशेठ यांनी आधुनिक व सेंद्रिय शेती आणि पारंपरिक शेती यातील फरक तसेच शासनाच्या विविध योजना या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने गांडूळखत निर्मिती, सेंद्रिय शेती, कुकुट-पालन, दुग्ध उत्पादन आणि जीवामृत प्रकल्प यांचा समावेश होता. या एकदिवसीय दौऱ्यामध्ये महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील 25 विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.