*कोकण Express*
*दिव्यांग बांधवांचा१७ डिसेंबर रोजी गोपुरीत मेळावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिव्यांग बांधवांचा मेळावा शुक्रवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, अॅड. बी.आर. पाटील हे दिव्यांगांना शासकीय योजना व अन्य माहिती देणार आहेत. तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन एकता दिव्यांग विकास संस्था कणकवली आणि गोपुरी आश्रम यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुनील सावंत, सचिन सादये (वरवडे) यांच्याशी संपर्क साधावा.