*कोकण Express*
*जि प अध्यक्षा सौ संजना सावंत आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या माध्यमातून दारिस्ते गावात विकासगंगा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी दारिस्ते, ता. कणकवली येथे मा सौ संजना सावंत जि प अध्यक्षा सिंधुदुर्ग यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
१) जि प स्वनिधी मधून *दारिस्ते हुले पवारवाडी रस्ता*, रक्कम ६ लाख
२) जन सुविधा योजनेतून *दारिस्ते हुले येथे स्मशान शेड*, रक्कम ३.५ लाख
३) १५ व्या वित्त आयोगातून दारिस्ते गुरववाडी येथे *विंधन विहिर खोदून नळ योजना*, रक्कम ३.५ लाख
४) जि प स्वनिधीतून *दारिस्ते गुरववाडी येथे मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर रस्ता,* रक्कम ६ लाख
५) जि प *शाळा दारिस्ते नं १ , सभागृह नूतनीकरण*, रक्कम ७ लाख
यावेळी सोबत संजय सावंत सरपंच दारिस्ते,मयुरी मुंज, सरपंच सांगवे, सीताराम गुरव उपसरपंच दारिस्ते, संजय गावकर, सुनिता पवार, विजया बागवे, काका रासम, बाळा ठाकूर, लक्ष्मण ठाकर, पांडूरंग पवार, संतोष देसाई, एकनाथ राणे, प्रदीप मोडक, सुनील पवार, सुनील ठाकूर आणि दारिस्ते गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.