अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प तळेरे येथे संपन्न

अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प तळेरे येथे संपन्न

*कोकण  Express*

*अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प तळेरे येथे संपन्न*

*कासार्डे ः संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि आदर्श व्यापारी संघटना, तळेरे यांच्यावतीने तळेरे येथील कल्याणकर काॅम्प्लेक्स येथे सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना संदर्भात संबंधित व्यापारी वर्गाचे अर्ज भरून घेण्यात आले.याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष राजू जठार,उपाध्यक्ष दशरथ कल्याणकर,चंद्रशेखर डंबे,निलेश सोरप,जगदिश मोरजकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाला अन्न सुरक्षा परवाना नव्याने काढता यावा किंवा त्याचे नुतनीकरण सुलभपणे करता यावे यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्हाभर विविध बाजारपेठांच्या ठिकाणी अन्न सुरक्षा परवाना कॅम्पचे आयोजन केले आहे.त्याच अनुशंगाने तळेरे येथे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.यामुळे व्यापारी वर्गाला अन्यत्र फेऱ्या माराव्या न लागता इथल्या इथेच कागदपत्रे सादर करुन परवाना मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

त्याचबरोबर सर्व व्यापारी व अन्य व्यावसायिकांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या पतसंस्थेचे सभासद होऊन ठेवी पिग्मी सुरू करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर व आदर्श व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष राजू जठार यांनी सर्व उपस्थित व्यापारी वर्गाला केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!