*कोकण Express*
*सिंधुदुर्ग भाजपाच्या युवा मोर्चा चिटणीसपदी बंटी राजपुरोहित यांची निवड…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चा संघटनेच्या जिल्हा चिटणीसपदी बंटी राजपुरोहित यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, मंदार नार्वेकर, अमित परब आदी उपस्थित होते.