रस्त्यात अपघात होतात म्हणून कोणी चालायचे सोडत नसते ,तसे सायबर गुन्हे होतात म्हणून आॅनलाईन व्यवहार टाळायचे नसते

रस्त्यात अपघात होतात म्हणून कोणी चालायचे सोडत नसते ,तसे सायबर गुन्हे होतात म्हणून आॅनलाईन व्यवहार टाळायचे नसते

*कोकण Express*

*रस्त्यात अपघात होतात म्हणून कोणी चालायचे सोडत नसते ,तसे सायबर गुन्हे होतात म्हणून आॅनलाईन व्यवहार टाळायचे नसते*

*आपला पासवर्ड हा लक्षात ठेवण्यास सोपा आणि ओळखण्यास अवघड ठेवावा.*

*कासार्डे ः संजय भोसले*

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामध्ये सायबर गुन्हे बाबत जागरुकता येण्यासाठी सी. आय. इ .टी , आणि एन. सी .इ .आरटी. नवी दिल्ली यांचेमार्फत सायबर सुरक्षा वर आधारित मार्गदर्शन सत्रात तंत्रस्नेही व विषय सहाय्यक तानाजी खंडागळे (डायट —उस्मानाबाद) हे ऑनलाइन व्याख्यान देत होतें.
भारत सरकारच्या गृह व संरक्षण विभागामार्फत सायबर गुन्हे नियंत्रीत करण्यासाठी, भारतीय सायबर गुन्हे अन्वेषण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे .या कार्यालयामार्फत सायबर सुरक्षा वर आधारित ,विविध तज्ञ व्यक्ती मार्फत मार्गदर्शन पर सत्राचे आयोजन करण्यात आले असून 6 ऑक्टोबर 2021 पासून महिन्याच्या पहिल्या बुधवारी अशा प्रकारचे मार्गदर्शन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राध्यापक तानाजी खंडागळे यांचे उद्बोधन महत्त्वाचे होते.
खंडागळे यांनी सायबर गुन्ह्यापैकी स्मिनिंग ,फिशिंग, मिसिंग आणि विशिंग या चार सुत्रांपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे असे सांगितले. कारण या चारही गोष्टींमध्ये हॅकर्स आपल्यासाठी जाळे निर्माण करत असतात .आपल्या मोबाईल किंवा संगणक अथवा लॅपटॉप मधील पूर्ण डाटा मिळवला जातो. पासवर्ड मिळवून अक्षरशः लुटले जाते. यामध्ये भावनिक मेसेज पाठवून आर्थिक मदत मागितली जाते .एखादी लिंक पाठवून हवे तिथे घेऊन जाणे व आपला मोबाईल हॅक करणे असे प्रकार सर्रास होतात. म्हणून सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
*अशावेळी काय कराल?*
अनोळखी व्यक्तीचा कॉल आल्यास कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. जुने डिवाइस विकताना फॉर्मेट करूनच विकावी. मग ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी , संगणकावर अथवा टॅब किंवा मोबाईलवर एकापेक्षा जास्त टॅब ओपन करून ठेवू नये. ए.टी.एम. मधून पैसे करताना पॅनल मध्ये कोणतीही विचित्र अथवा संशयास्पद वस्तू नाही ना याची खात्री करावी .पासवर्ड डायल करताना कोणीही पहात नाही हे लक्षात घ्यावे .मोबाईलमध्ये अँटीव्हायरस असणे गरजेचे आहे. शक्यतो पेड अँटीव्हायरस निवडावा. मोबाईल मध्ये पर्सनल फोटो अपलोड करताना आवश्यक्ता बाळगावी, अनावश्यक फोटो टाळावेत. यू.एस.बी .किंवा किलॉगर, पेनड्राईव्ह ,ज्युस जॅकिंग इत्यादी द्वारेही आपला फोन हॅक होऊ शकतो. म्हणून काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
कोणत्याही दोन अकाउंटला सारखाच पासवर्ड ठेवू नये.” पासवर्ड लक्षात ठेवण्यास सोपा आणि ओळखण्यास अवघड असाच ठेवावा”.
“रस्ते अपघात होतात म्हणून आपण चालवणे सोडत नाही. तसे सायबर गुन्हे होतात म्हणून ऑनलाइन व्यवहार करणे टाळायचे नाही”. तर ती सध्याची गरज बनली आहे .जागरूकता दाखवल्यास काहीच अवघड नाही .तर हे मार्गदर्शन राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना उपयोगी ठरेल असा विश्वास खंडागळे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!