कासार्डेतील महादेव मार्बल मालकाला 70 हजारांचा हातोहात गंडा

कासार्डेतील महादेव मार्बल मालकाला 70 हजारांचा हातोहात गंडा

*कोकण  Express*

*कासार्डेतील महादेव मार्बल मालकाला 70 हजारांचा हातोहात गंडा*

*▪️गिऱ्हाईक असल्याचा बहाणा करून गंडवले*

*भामटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद*

*कासार्डे ः संजय भोसलेे*

कासार्डे येथिल महादेव मार्बल या टाईल्स शोरुमच्या मालकाला अज्ञात इसमाने 70 हजार 100 रुपयाचा गंडा घातला. तळेरे ग्रामपंचायतीच्या वरच्या मजल्याचे काम सुरु आहे यासाठी लादी व इतर मटेरीयल लागणार आहे, असा बनाव अज्ञात भामट्याने करत ऑनलाईन पेंमेट केल्याचा मेसेज दाखवून माझ्याकडे कॅश नाही तो पर्यंत मला सत्तर हजार द्या असे सांगून पैसे घेऊन अज्ञात इसम पसार झाला. या घटनेमुळे कासार्डे पसिरात एकच खळबळ उडाली असून सदर घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

मुंबई गोवा महामार्गालगत कसार्डे ब्रीजच्या अगोदर फसवणूक झालेली नरपतकुमार हमताराम माळी, मूळ रा.जलोरे, राजस्थान (सध्या रा.कासार्डे जांभळगाव) याच्या मालकीचे महादेव मार्बल टाईल्स शोरुमचे दुकान आहे. सोमवारी दररोज प्रमाणे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास स्विफ्ट कार महामार्गावर पार्कींक करुन एक इसम लादी पाहण्यासाठी शोरुमध्ये आला यानतंर त्याने लादी पसंत करत तळेरे ग्रामपंचायतीच्या वरच्या मजल्याचे काम सुरु आहे असे सांगत सुमारे 1 लाख 89 हजार छत्तीस रुपयाचा माल खरेदी करुन माल सकाळी पाठवा असे सांगत माझ्याकडे कॅश नाही तोपर्यंत तुम्ही मला 70 हजारांची कॅश द्या ते पैसे मी तुम्हाला एनएफटी व्दारे ऑनालईन पेमेंट करतो असे सांगत मेसेज दाखवत तुमचे पेमेट मी केले आहे असे सांगत आपल्या मोबाईल व्दारे व्हाटसअप स्क्रीनशॉट पाठवला.

यानतंर सदर इसम पैसे घेऊन गेल्यानतंर माळी यांनी पाहीले असता आपल्याला पैसे पोहचले नसल्याचे खात्री करुन त्याचा व्हॉटसअप मेसेस पाहीला मात्र त्त्याने तो मेसेज डिलिट करीत मोबाईल सुध्दा स्वीच ऑफ केला. यानतंर आपली फसगत झाल्याचे समजल्यानतंर माळी याच्या पायाखालची जमीन सरकली. सदरची घटना त्यांनी आपले कर्मचारी व स्थानिकांना सांगत दुकानात लावलेल्या सासीटीव्हीव्दावरे त्या इसमाची माहिती मिळवत कणकवली पोलीस स्टेशन गाठत याबाबत आपली फसवणूक झाल्याची माहिती कणकवली पोलीस स्थानकात देत याबाबत तपास करण्यासाठी अर्ज केला. मात्र अज्ञात इसमांने दिवसा ढवळ्या फसवणूक करीत सत्तर हजार लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!