कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या उमेदवारी अर्जाची छाननीत ५१ अर्जा पैकी ३६ अर्ज व्यद्य

कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या उमेदवारी अर्जाची छाननीत ५१ अर्जा पैकी ३६ अर्ज व्यद्य

*कोकण  Express*

*कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या उमेदवारी अर्जाची छाननीत ५१ अर्जा पैकी ३६ अर्ज व्यद्य*

*निवडणूक अधिकारी शिंगणकर यांची माहिती*

*दोडामार्ग ः  लवू परब*

कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या उमेदवारी अर्जाची आज बुधवारी छाननी करण्यात आली यावेळी ५१ अर्जा पैकी ओ बी सी ४ प्रभाग स्थगित करण्यात आले असल्याने त्यातील ११ अर्ज स्थगित करून उरलेल्या ४० अर्जा पैकी ३६ अर्ज व्यद्य ठरले व ४ अर्ज अव्यद्य झाल्याचे निवडणूक अधिकारी शिंगणकर यांनी सांगितले
कसई-दोडामार्ग नगरपंचायच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मंगळवारी ७ डिसेंबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख झाल्यावर आज बुधावरी ८ डिसेंबर रोजी छाननी करून टोटल १७ जागांसाठी ५१ अर्ज भरले गेले होते त्यातील ओ बी सी प्रवर्गातील ४ म्हणजे प्र . १,४,८,१० या प्रभागतील निवडणूक स्थगित करण्यात आली असल्याने ५१ पैकी ११ अर्ज स्थगित करण्यात आले. त्यामुळे ४० अर्ज शिल्लक राहिले त्यातील ४ अर्ज अव्यद्य ठरले त्यातील प्र. क्र.2 मधील विष्णूं नारायण खांबल, व पांडुरंग मधुकर खांबल, प्र.३ मधून लीना महादेव कुबल , प्र .७ मधून राजाराम महादेव गवस असे ४ अर्ज अव्यद्य ठरले.
माजी नगराध्यक्ष सौ लीना कुबल यांचा शिवसेने कडून भरलेला अर्ज अव्यद्य ठरत त्यांचा अपक्ष अर्ज व्यद्य ठरल्याने सेने कडून निवडून आलेल्या सौ लीना कुबल यांनी सेनेशी यावेळी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.
आज बुधावरी छाननी झाल्या नंतर १३डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!