*कोकण Express*
*दोडामार्गमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीने एकत्र येत भाजप विरोधात जोरदार केली मोर्चेबांधणी*
*राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी*
*दोडामार्ग ः लवू परब*
दोडामार्गमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीने एकत्र येत भाजप विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना यापुढे सत्तेत राहता येणार नाही. त्यांना आम्ही सत्तेपासून दूरच ठेवू. सत्ता आमचीच येणार आहे असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांनी व्यक्त केले.
येत्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या कसई दोडामार्ग नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आघाडीच्यावतीने निवडणूक लढविली जात आहे. आठ जागा राष्ट्रवादी तर नऊ जागा शिवसेना यांना सोडल्या आहेत. ज्यांचे जास्त नगरसेवक त्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुरेश दळवी यांनी सांगितले आहे.मागील पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाने येथील मतदार जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. उलट जनतेच्या पैशाची लुट केली. विधायक कामे केली नाहीत.
दोडामार्ग शहरवासीयांना हवा तसा न्याय भाजपा देऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवणे हे योग्य आहे,असेही दळवी म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, संदीप गवस, सुशांत राऊत, उल्हास नाईक, सुदेश तुळसकर, बाबा खतीब, दिपक जाधव, गोविंद शिरोडकर, रामचंद्र चांदेलकर, गौतम महाले, अभिजित देसाई, इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.