*कोकण Express*
*बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी आज सहा उमेदवारी अर्ज दाखल…*
*बांदा ः प्रतिनिधी*
शहर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये होणाऱ्या पोटनीवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने अद्यापही अधिकृत उमेदवार जाहीर केला नसल्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत एकूण ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आज भाजपचे युवामोर्चा बांदा मंडल उपाध्यक्ष संदीप बांदेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सर्वप्रथम अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे, बांदा भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष साई सावंत, सचिन बांदेकर, उत्तम बांदेकर, ओंकार धुरी, रणजीत बांदेकर, सिताराम बांदेकर, विनोद बांदेकर, दत्ताराम बांदेकर, हर्षद बांदेकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभरात निलेश मधुकर सावंत, ऋषिकेश सीताराम देसाई, गोविंद केशव सावंत, राजाराम सावळाराम सावंत, लक्ष्मी राजाराम सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
उद्या ७ रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर ९ डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. शिवसेना पुरस्कृत समीर श्रीकांत पेळपकर यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपने अद्यापपर्यंत आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नसून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार असल्याचे सरपंच अक्रम खान व उपसभापती शीतल राऊळ यांनी सांगितले.