*कोकण Express*
*मराठी समृध्द करण्यासाठी गोवा आणि कोकण सारखी समृद्ध भूमी कोठेही शोधून सापडणार नाही.म्हणून व्यावसायिक नाटकाची सुरूवात कोकणातूनच*
*” खिडकी “द्वारे मानवी भावभावची अनेक कवाडे अभिनेते प्रदीप कबरे यानी उलघडली*
*कासार्डे ः संजय भोसले*
जमवलेल्या माणसांपेक्षा जमलेली माणसे ही अधिक मूल्यवान असतात कारण त्यांच्यात आत्मीयता ठासून भरलेली असते असे प्रतिपादन लेखक ,कवी ,नाट्यअभिनेते, सिनेअभिनेते व समालोचक म्हणून गाजलेले आघाडीचे कलाकार प्रदीप कबरे यांनी प्रतिपादन केले .ते मुळचे शिरोड्याचे असून प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत .तळेरे येथे “संवाद परिवारा”मार्फत आयोजित “खिडकी” च्या माध्यमातून मानवी भावभावनांचे अनेक पैलू रसिकांसमोर अलगद उलगडत होते.
ते म्हणाले की रजनी जोशी, जगन्नाथ कांदळगावकर. आधी दिग्गज व्यक्ती बरोबर काम करण्याची संधी उपलब्ध झाली तर बिनाका गीतमाला ची पत्रे साॅर्ट आउट करून अमीन सयानी यांना देत असे. जवळ जवळ 2000 कमर्शियल ध्वनिमुद्रित चे लेखन केले असून खऱ्या अर्थाने “खिडकी” द्वारे लेखनास सुरुवात झाली यातील बऱ्याच खिडक्या श. ना. नवरे यांच्या नजरेखालून गेलेल्या असून १२ खिडक्या लिहून झाल्यानंतर त्यांचे दुःखद निधन झाले गंगाराम गवाणकर यांनी मात्र नंतरच्या खिडक्यांना प्रस्तावना दिली सध्या मालवण मध्ये 25 वा कार्यक्रम केल्यानंतर आज 26 व्या कार्यक्रमाला तळेरे येथे हजर आहे.
कॉंक्रिटच्या रस्त्यापासून सुरू झालेला “खिडकीचा प्रवास” सिग्नल ,काहीही न ठरवता ,शालन भाव ,व्हॅलेंटाईन डे ,डीमाॅलिशन, भिक ,असे करत शेवटची खिडकी ‘झेंड्या ‘जवळ कधी पोहोचली हे रसिकांना कळलेच नाही. मध्यंतरी सादर केलेल्या “शब्द “या कवितेने तर एक वेगळाच शब्द भाव रसिक मनावर उमटवला रात्री ८ नंतर बोचऱ्या थंडीतही खिडकीची किमया अनुभवण्यात तरेळे वासीय मंत्रमुग्ध झाले होते. किंबहुना प्रदीप कबरे यांच्या भारदस्त आवाजाने ते भारावूनच गेले होते.
तत्पूर्वी तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजू जठार यांचा प्रदीप कबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संतोष टक्के (नाट्य लेखक व कलाकार), संजीवनी पाटील, दादासाहेब महाडिक ,राजू माळवदे ,जयप्रकाश परब ,सचिन पावसकर ,निकेत पावसकर, यांनाही प्रदीप कबरे लिखित पुस्तक देऊन गौरवण्यात आले. तर दादासाहेब महाडिक आणि डॉक्टर भागवत यांच्या हस्ते प्रदीप कबरे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. नवोदित कलाकार अक्षय मेस्त्री यांनी प्रदीप कबरे यांचा काढलेला फोटो त्यांना प्रदान केला. यावेळी तळेरे येथील प्रतिष्ठीत दिवंगत लेखक,कवी व पत्तकार मधुसूदन नानीवडेकर यांच्या नावाने” मधु कट्टा “बांधला जाणार असल्याचे डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन व आभार मिलिंद कुलकर्णी यांनीच मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.