*कोकण Express*
*व्यापारी महासंघातर्फे अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नोंदणी कॅम्पचे आयोजन*
*मालवण ः प्रतिनिधी*
खाण्याच्या सर्व वस्तूंच्या खरेदी- विक्री साठी अन्न सुरक्षा परवाना व नोंदणी आवश्यक असून ती नसल्यास दि. १ जानेवारी २०२२ पासून माल घेता व विकत येणार नाही. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे ७ ते १४ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, बार, बेकरी, किराणा, भुसारी व्यापारी, पान स्टॉल, स्टॉल धारक, घरगुती खानावळ, मत्स्य विक्रेते, मांस व मटण विक्रेते, खाद्य पदार्थ उत्पादक व विक्रेते, धाबा व फिरते विक्रेते यांना अन्न सुरक्षा परवाना घेणे जरुरीचे आहे. तो न घेतल्यास दि. १ जानेवारी २०२२ पासून व्यापार करता येणार नाही. व त्यास १ हजार रु. ते १ लाख रु. पर्यंत दंड व कारावास होऊ शकतो. यादृष्टीने जिल्हा व्यापारी महासंघातर्फे जिल्ह्यात कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत व्यापार भवन कुडाळ (सर्व कुडाळ तालुक्यासाठी) येथे, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. कणकवली तालुका (कनेडी, नरवडे, फोंडा व इतर), दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वा. वैभववाडी व्यापार भवन येथे, दु. ३.३० ते सायंकाळी ६ वा. खारेपाटण- विष्णू मंदिर, सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वा. तळेरे येथे, दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दु. २ वा. कट्टा नेवाळकर ऑफिस- कट्टा, पेंडूर, विरण, मसुरे, पोईप, चौके सुकळवाड, बागायत येथे, तर दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वा. भेडशी दोडामार्ग याठिकाणी कॅम्प होणार आहेत. अधिक माहितीसाठी कुडाळ- श्रीराम शिरसाट (९५४५८९८९८९), कणकवली- दीपक बेलवलकर (९४२२४३४५०१), वैभववाडी – मनोज सावंत (९४२१1४४५०६), तळेरे- राजू जठार (९४२२३८१०४७), वेंगुर्ला – विवेक खानोलकर (९४२२४३४३८८), सावंतवाडी – जगदीश मांजरेकर (९४२२३७९६०४), देवगड – प्रसाद पारकर (९४२३०५१७५५), मालवण – प्रमोद ओरसकर, दोडामार्ग – सागर शिरसाट (८३९००३१८१३) यांच्याशी संपर्क साधावा. तरी संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी त्वरित अन्न सुरक्षा परवाना व नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.