*कोकण Express*
*शिवसेना शाखा ही सर्वपक्षीय जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी-संजय आंग्रे*
*घोणसरी गावात शिवसेना शाखेचे शानदार उदघाटन*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
शिवसेना पक्षप्रमुख मा. स्व.बाळासाहेव ठाकरे यांना अभिप्रेत असलेली संघटना गावागावात उभी करण्यासाठी गाव तिथे शिवसेना शाखा झाली पाहिजे.शिवसेना शाखा ही कोणत्याही एका पक्षाच्या लोकांसाठी नसून गावातील प्रत्येक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न किंवा अडचणी सोडविण्यासाठी असली पाहिजे असे प्रतिपादन येथील जि प सदस्य संजय आंग्रे यांनी केले ते घोणसरी गावाच्या शिवसेना शाखा उदघाटन प्रसंगी बोलत होते.
दरम्यान यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उदघाटन तथा मालाड चे माजी शाखा प्रमुख बाळा राणे,जि प चे माजी कृषी सभापती संदेश पटेल,तालुका प्रमुख शैलेश भोगले,विभागप्रमुख शांताराम राणे,शाखा प्रमुख कृष्णा एकावडे,महिला शाखा प्रमुख स्वाती घाडी,फोंडा शहर प्रमुख सुरेश टक्के,आबु पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका प्रमुख शैलेश भोगले यांच्या हस्ते भगवा फडकवून नंतर मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्विपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक बाळा राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले,या घोणसरी गावात शिवसेना शाखा असावी अशी माझी पूर्वी पासून खूप ईच्छा होती ती आज पूर्णत्वास येत आहे.मात्र या शाखेचा उपयोग तळागाळातील सर्वच लोकांसाठी उपयुक्त ठरला पाहिजे,कोणत्याही पक्षाचा भेदाभेद न करता लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या गेल्या पाहिजेत आणि असे झाले तर मला पूर्ण विश्वास आहे येथील जनता कधीच बेईमान होणार नाही आणि ती शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.आणि भविष्यात आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपली सत्ता आणायची असेल तर येथील प्रत्येकाला खूप कष्ट घ्यावे लागतील. तळागाळापर्यंत बाळासाहेबांचे,शिवसेनेचे विचार आणि केलेली कामे पोचवावी लागतील आणि त्यामाध्यमातून आज जे शाखा म्हणजे आपले शिवमंदिर सुरू केले आहे ते जर आपण कायम चालू ठेवले तर मला पूर्ण विश्वास आहे येथील कोणत्याही शिवसैनिकास काहीही कमी पडणार नाही.
जि प चे माजी कृषी सभापती संदेश पटेल यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करताना सांगितले,आज शिवसेना शाखा उदघाटन प्रसंगी जमलेले मोठ्या प्रमाणावर नागरिक पाहून मला असे वाटते की ,भविष्यात या घोणसरी गावातील प्रत्येक घराघरात शिवसेनेचे विचार रुजणार आणि या विभागातून शिवसेनेला एकमुखीं आणी एकहाती सत्ता मिळणार आहे यानंतर आमची जबाबदारी असेल या विभागातून कोणाचीही समस्या किंवा काहीही अडचण असल्यास आम्ही आपल्या सोबत असणार आणू भविष्यात विकास कसा असतो हेही दाखवून देऊ.
तर शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले यांनी आपले विचार मांडताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले,सन २००५ मध्ये ज्यांना शिवसेनेने मोठे केले त्यांनी आपल्या स्वार्थसाठी शिवसेना सोडली आणि त्यावेळी शिवसेनेमध्ये मोठी पडझड झाली मात्र त्या ही कठीण काळात घोणसरीतील मंगेश राणे,बाळा राणे सारखे निष्ठावंत टिकून होते.आणि घोणसरी गावात शिवसेना शाखा दिमाखात उभी राहत असताना मंगेश राणें न सह घोणसरी गावातील सर्व शिवसैनिकांनी घेतलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत आहे आणि सुवर्णक्षण आहे की,या फोंडाघाट विभागात पहिली शाखा सुरू करण्याचा मान घोणसरी गावाने मिळविला आहे.
घोणसरी गावात शिवसेना शाखा सुरू करण्यासाठी येथील उपविभाग प्रमुख रवींद्र शिंदे,शाखा प्रमुख कृष्ण एकावडे,बूथ प्रमुख दिलीप शिंदे,सचिन सुतार,संदीप मेस्त्री,विजय मराठे,गोटू राणे,मंगेश राणे,दर्शन मराठे,सुभाष बुकम,योगेश पाटील,महिला शाखा प्रमुख स्वाती घाडी, वृषाली शिंदे,शैलजा कारेकर,मीना बुकम,सुहासिनी एकावडे यांच्या सह सर्व शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.