*कोकण Express*
*श्री.देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रौत्सव ८ डिसेंबरला..*
*हा जत्रोत्सव कोंब्याचा म्हणून विशेष प्रसिद्ध..*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर मातोंड गावचे देवस्थान श्रीदेव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव 8 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. 360 चाळ्यांचा अधीपती म्हणून श्री देव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. या जत्रेला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. श्री देव घोडेमुख देवस्थान 360 चाळयाचा अधीपती म्ह म्हणून प्रसिद्ध आहे.
या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्हा बरोबर पूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच कर्नाटक, गोवा राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक या देवाच्या वार्षिक जत्रोत्सव येतात. हा जत्रोसव कोब्यांचा जत्रोत्सव म्हणून विशेष प्रसिद्ध आहे.
यावेळी तसेच सालाबाद कोंबा देउन तसेच ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात ते कोंबा देऊन आपला नवस फेडतात. हे जागृत देवस्थान असून ऊंच
डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. या देवस्थानचा वार्षिक जत्रा सोहळा येथील देवस्थान कमिटी योग्य नियोजन करून हा कार्यक्रम साजरा करतात.