*कोकण Express*
*सिंधुदुर्गचे सुपुत्र लेफ्टनंट कमांडर सुरज वारंग “नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदकाने” सन्मानित…*
*विमान मेंटेनन्सवर कौशल्य दाखविल्याने गौरव; जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत असलेले सिंधुदुर्गातील माणगावचे सुपुत्र सुरज जयसिंग वारंग यांना “नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदकाने” सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आत्मनिर्भर भारतच्या धोरणास अनुसरून विमान मेंटेनन्सवर कौशल्य दाखविल्यामुळे त्यांचा “नौदल दिनी” गौरव करण्यात आला. दरम्यान त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एम. आय. जी. २९ के या नेव्हीतील विमानाच्या मेंटेनन्स बाबत सुविधा भारतात नव्हती. विमानांचे मेंटेनन्स रशिया कडून करून घेतले जात होते. विमानांच्या ओव्हर ऑल फॅसिलिटी भारतात सेटअप करण्याबाबत लेफ्टनंट कमांडर सुरज वारंग यांनी प्रयत्न केला. व त्यात तो यशस्वी झाला. आज विमान मेंटेनन्स करिता रशियावर अवलंबून राहावे लागत नाही. नेव्हीच्या विमानांचे ओव्हर ऑल फॅसिलिटी सेटअप भारतात होत आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत होत आहे. लेफ्टनंट कमांडर सुरज यांच्या या व नौलातील अन्य कामाची दखल घेऊन नौदलाने त्यांना ” नौसेना अध्यक्ष प्रशंसा पदक ” देऊन सन्मानित केले आहे.
माणगाव येथील अँड. जयसिंग वारंग व प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली वारंग यांचा सुरज हा सुपुत्र आहे. सुरज यांची पत्नी सौ. ज्युही वारंग नौदलामध्ये लेफ्टनंट कमांडर आहे. सुरज यांचे एसएससी पर्यंतचे शिक्षण माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात झाले. लहानपणापासून त्याला विमानाबद्दल आकर्षण होते. व त्याला पायलट होण्याची इच्छा होती, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करून हे यश मिळविले आहे.