*कोकण Express*
*अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सत्कार*
*कासार्डे ः संजय भोसले*
मल्लखांब या क्रीडा प्रकारात बजावलेल्या उत्तुंग यशाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पीरखान , कणकवली तालुका सदस्य प्रवीण गायकवाड, मनोज वारे, कुडाळ तालुका सदस्य गणेश मेस्त्री, प्रमिला वाडकर आदी उपस्थित होते.