*कोकण Express*
*सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांची उणीव सतीश सावंत यांनी भरून काढली..*
*सिंधुदुर्ग*
सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक एका उंचीवर नेऊन ठेवली होती. ही बँक जिल्हयाचे वैभव आहे. सर्वसामान्य लोकांची बँक म्हणून आज जिल्हा बँकेची ओळख आहे. सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांची उणीव नेमकी कोण भरून काढणार याची खंत होती मात्र सतीश सावंत यांनी ती उणीव भरून काढली.
ही बँक शेतकर्यांची आणि सर्वसामान्य जनतेची आहे ती तशीच राहावी यासाठी समस्त जिल्हावासीयांना एक विनंती आहे की सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभे आहे त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहा. विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी जिल्ह्याच्या विकासाचा विचार करावा. गेल्या काही दिवसांमध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त थकबाकी भरण्यात आली. एवढी रक्कम अचानक आली कोठून याचा देखील विचार सर्वसामान्य मतदारांनी करावा असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, युवा नेते संजय पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जानव्ही सावंत, नागेंद्र परब, व्हिक्टर डान्टस, मर्गज, प्रसाद बांदेकर, आदी पदाधिकारी आणि जिल्हा बँक उमेदवार उपस्थित होते..