*कोकण Express*
*कणकवलीत पोलिसांचे प्रसंगसावधान, अनर्थ टाळला*
*कणकवलीत भरचौकात हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरने घेतला पेट*
*पोलीस हवालदार कैलास इंपाळ यांच्या सतर्कतेचे होतेय सर्वत्र कौतुक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पटवर्धन चौकात आज रहदारीच्या वेळेतच दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास काकडेयांच्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरने पेट घेतला. आणि कणकवली पटवर्धन चौकात एकच गडबड गोंधळ उडाला.
ह्या हॉटेलजवळ लोकांची धावपळ पाहून याचवेळी तेथे असलेले कणकवली पोलिस स्टेशनचे पोलीस कैलास इंपाळ व वाहतूक पोलीस संदेश आबिटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रसंगावधान राखत तात्काळ सिलेंडरला लागलेली आग आटोक्यात आणली. कैलास इंपाळ यांनी तातडीने तेथील पायपुसणी ओलीकरत सिलिंडरच्या आग लागलेल्या रेगुलेटरच्या भागाला गुंडाळत आग आटोक्यात आणली. यामुळे मात्र पुढे घडणारा मोठा अनर्थ टाळला. पोलीस कर्मचारी कैलास इंपाळ यांच्या या सतर्कतेनेबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.