सकाळच्या बातम्या : २ डिसेंबर २०२१

सकाळच्या बातम्या : २ डिसेंबर २०२१

*कोकण  Express*

 *सकाळच्या बातम्या : २ डिसेंबर २०२१*

*_आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा_*
हवामान खात्याने आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. अशातच आता ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे.

*_ओमिक्रॉनला रोखणार कोव्हिशील्डचा बूस्टर डोस?; सीरमने उचलले पुढचे पाऊल_*
ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट घोंगावत असताना या विषाणूला रोखण्यासाठी तातडीची पावले उचलण्यात येत आहेत. असे असतानाच सीरम इन्स्टिट्युटकडून केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

*_माजी आमदार पुत्राच्या लग्नाची होतेय सर्वत्र चर्चा; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक_*
लसीकरणाचे प्रबोधन व्हावे या साठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र बीडमध्ये एका लग्न सोहळयात चक्क वऱ्हाड्यांचं लसीकरण करण्यात येत आहे.तसंच, लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जातोय

*_’या’ IIT च्या विद्यार्थ्याला २ कोटी रुपये पगाराच्या पॅकेजची ऑफर!_*
आयआयटी बीएचयूमध्ये सध्या प्लेसमेंट ड्राइव्ह सुरू आहे. यंदा एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला आहे. पहिल्याच दिवशी एका विद्यार्थ्याला चक्क दोन कोटी रुपयांचं पॅकेट असणाऱ्या नोकरीची ऑफर मिळाली आहे.

*_राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र, मृत्यूसंख्या घटल्याने दिलासा_*
राज्यात काल७६७ नव्या रुग्णांचे निधन झाले असून ९०३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ३९१ वर खाली आली आहे.

*_डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात काल दुपारी दोनदा जाणवले भूकंपाचे धक्के_*
पालघर जिल्ह्यामधील डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात काल दुपारी दोनदा जाणवले भूकंपाचे धक्के आहेत. दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ४.0 रिक्टर स्केलचा पहिला तर ३ वाजून ५७ मिनीटांनी ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!