जत्रेत जुगारावर धाडी घालून मर्दूमकी गाजविण्यापेक्षा ग्रामीण भागातील मटका दारु बंदी करा ; भास्कर परब

जत्रेत जुगारावर धाडी घालून मर्दूमकी गाजविण्यापेक्षा ग्रामीण भागातील मटका दारु बंदी करा ; भास्कर परब

*कोकण  Express*

*जत्रेत जुगारावर धाडी घालून मर्दूमकी गाजविण्यापेक्षा ग्रामीण भागातील मटका दारु बंदी करा ; भास्कर परब*

*बांदा ः लवू परब*

जत्रा हा उत्सव काही सिझन पूर्ता आहे. तिथे काही ठिकाणी विरंगुळा म्हणून जुगार सुरू असतात हे चुकीचेच आहे,आणि ते बंद व्हायलाच हवेत,पण पोलिसांच्याच आशिर्वादाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी ग्रामीण भागात रात्रंदिवस बिनधास्त राजरोसपणे धंदे कुणाच्या कृपाशीर्वादाने सुरू आहेत,तेही पोलिस प्रशासनाने जाहीर करावे.

सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष त: काही ग्रामीण भागात मटका,दारु धंदे हे राजरोसपणे स्थानिक बीट हवालदार यांच्या कृपाशीर्वादानेच  सुरू आहेत, आणि ते कशासाठी सुरू आहेत,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.पण डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीच्या भुमिकेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना हे बेकायदेशीर धंदे दिसत नाही हीच या जिल्ह्याची शोकांतिका आहे.आम्ही सर्वंच पोलिस विभागाला दोष देत नाही,पण जे कोणी यात समाविष्ट आहेत तिही संख्या कमी नाही,

*_ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती यांच्या कडे द्या*

स्थानिक पातळीवर ग्रामीण भागात मटका दारु धंदे मोठ्या प्रमाणात पोलीसांच्याच कृपाशीर्वादाने सुरू आहेत. जोपर्यत ही जबाबदारी पोलिसांवर आहे. तोपर्यत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होणार नाहीत,पण पोलिस प्रशासनाने म,गां, ,तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यास अवैध धंदे बंद व्हायला वेळ लागणार नाही, पोलिस प्रशासनाने ही जबाबदारी काही कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्थानिक पातळीवर देऊन रिझल्ट बघावा, अशी मागणी तेर्सेबाऺबर्डे गावचे माजी सरपंच भास्कर परब यांनी केली आहे.हा प्रयोग यशस्वी झाला तर जुगारावर धाडी घालण्यासाठी पोलीसांना जत्रेचा आधार घ्यावा लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!