*कोकण Express*
*▪️सावंतवाडी शहरात पालिकेने काढली “सायकल रॅली”…*
*▪️नगराध्यक्षांनी केला शुभारंभ; स्वच्छतेचा संदेश, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानातवसहभाग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वच्छताविषयी जनजागृती करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरात आज सकाळी “सायकल रॅली” काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वतः सायकल चालवत झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, देविदास आडारकर आदींसह मोठ्या संख्येने नगरपालिका कर्मचारी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.