*कोकण Express*
*▪️देवगड, कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग या भागात अग्निशामक बंब मंजूर…*
बागायती क्षेत्र अथवा ठिकठिकाणी लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देवगड, कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग या भागात अग्निशामक बंब मंजूर झाले आहेत. कसई दोडामार्ग, कुडाळ, देवगड- जामसंडे, वाभवे वैभववाडी शहरासाठी मिनी फायटर पुरविणे कामी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी दिनांक २६/१०/२०२१ रोजी एकूण २ कोटी १९ लक्ष ८१ हजार रुपये मात्र एवढा निधी मंजूर झाला आहे. देवगड, कुडाळ, वैभववाडी, दोडामार्ग या शहरांमध्ये अग्निशामक यंत्रणा पुरविणारे मिनी फायटरना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने यापुढे लवकरच या भागात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. निवडणुकीनंतर या कामाला अंतिम मंजूरी प्राप्त होऊन प्रत्यक्षात बंब प्राप्त होतील. त्यामुळे आगीसारख्या घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात हे बंब कामी येतील.