*कोकण Express*
*▪️कणकवली पं.स.चे अनाधिकृत उद्घाटन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा*
*▪️शिवसेना पदाधिकाऱ्यांची मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पंचायत समिती नवीन इमारत उद्घाटन कार्यक्रम भाजपा नेते ना.नारायण राणे यांच्या हस्ते अनाधिकृतपणे पार पडला. जिल्हा परिषद प्रमुख पदाधिकारी,पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेत तक्रार केली आहे.हा कार्यक्रम प्रशासकीय नसताना अधिकारी उपस्थित असल्याबद्दल पाटी लावण्यात आली.ती पाटी तातडीने हटविण्यात यावी,तसेच अनाधिकृत उद्घाटन करणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा,अशी मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे केल्याची माहिती तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी दिली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तालुकाप्रमुख शैलेश भोगले,संदेश पटेल,नगरसेवक कन्हैया पारकर,पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,राजु राठोड,महेश डिचवलकर,संतोष परब आदी उपस्थित होते.
नूतन इमारत प्रवेशद्वारावर जी पाटी पावली आहे,त्यावर जिल्हाधिकारी व इतर पदाधिकारी व गटविकास अधिकारी, उपअभियंता यांची नावे आहेत.ही बाब आम्ही प्रदीप नायर यांना आणल्यानंतर निदर्शनास आणून दिले.त्यांनी या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावणात येईल असे सांगितले.
केंद्रीय मंत्री राणे ज्यावेळी चिपळूण पूरग्रस्त दौरा झाला त्यावेळी अधिकारी नसल्याचा जाब विचारला होता.आता पंचायत समिती इमारत उद्घाटन झाले त्यात साधा बीडीओ किवा शिपाई नसताना जाब विचारण्याची गरज होती.त्यामुळे हा कार्यक्रम अनधिकृत पणे केला हे स्पष्ट झाले असा टोला शैलेश भोगले यांनी लागवला. पंचायत समिती उद्घाटन शासकीय कार्यक्रम असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली आहे.शासनाचा निधी खर्च पडल्याने पालकमंत्री यांना निमंत्रित करणे आवश्यक होते.भविष्यात अधिकृतपणे शासकीय उद्घाटन करण्याची मागणी विभागीय आयुक्त व पालकमंत्री यांच्याकडे करणार आहोत,असे शैलेश भोगले यांनी सांगितले.
पंचायत समिती इमारत उद्घाटन अनाधिकृत कार्यक्रम करणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांची चौकशी व्हावी.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी थातुरमातुर उत्तर दिली आहेत,त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रम होणे आवश्यक आहे.जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची शिफारस करावी,यासाठी आमचा लढा असेल,असे शैलेश भोगले यांनी सांगितले.
भाजपची कार्य प्रणाली ही भाजपची आहे की राणे भाजपची आहे.हे भाजपा नेते जठार यांनी जाहीर करावं,अधिकारी आले नसताना पाटी लावण्यात आली ती त्वरित काढण्यात यावी.चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे.