*कोकण Express*
*▪️सोमवारी टिळक भवन येथे ओबीसी सेल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चा न भूतो न भविष्यती असा जोरदार मेळावा झाला संपन्न*
सोमवारी टिळक भवन येथे दुपारी २वाजता ओबीसी सेल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चा न भूतो न भविष्यती असा जोरदार मेळावा झाला.यावेळी ३६जील्हाचा अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या पदग्रहण सोहळा संपन्न झाला,यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष माननीय श्री.नानाभाऊ पटोले,माजी राज्यमंत्री श्री. सूनीलराव देशमुख,ओबीसी सेल चे प्रांत अध्यक्ष श्री.भानुदास माळी साहेब,भंडारी समाज अखिल भारतीय चे नेते श्री.नवीन शेठ बांदिवडेकर आदी उपस्थित होते.यावेळी सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री.महेश ऊर्फ बाळु अंधारी साहेब,प्रदेश प्रतिनिधी श्री.महेश ऊर्फ प्रकाश डीचोलकर.महिला प्रदेश प्रतिनिधी सौ. आमिदी मेस्त्री मॅडम.हेमंत करंगुटकर ,प्रवीण आचरेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
यावेळी सिंधुदुर्गातील जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस श्री महिंद्र सावंत..युवक काँग्रेसच्या पल्लवी तारी.ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती नीलम करंगुटकर आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.