*कोकण Express*
*▪️केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सांत्वन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आईचे निधन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी समीर नलावडे यांची भेट घेत नलावडे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सचिन नलावडे, संदीप नलावडे आदी उपस्थित होते.