*कोकण Express*
*▪️फोंडाघाट महाविद्यालयाला देणगी*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटला कुंबळजाई देवी सामाजिक विकास संस्था कामोठे नवी मुंबई आणि सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जोड बाके 35 एकेरी बाके आणि खुर्च्या देणगी म्हणून देण्यात आले.
या संस्था नेहमी सामाजिक मदत करण्यात अग्रेसर असतात. विशेषतः ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांच्य निकडीवर ते लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचा त्यांचा उद्देश असतो. त्याच उद्देशातून या संस्थांनी कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटला दहा जोड बाके35 एकेरी बाके व खुर्च्या देणगी म्हणून दिल्या
या कामी सौ. सुजाता आंबेरकर व श्री. विनोद मोरे आणि महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. दीपक सावंत व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. श्रीकांत आपटे ,सेक्रेटरी, मनीष गांधी, खजिनदार समीर मांगले तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी आभार मानले व त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या,