स्व.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी मानवंदना

स्व.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी मानवंदना

*कोकण  Express*

*▪️स्व.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी मानवंदना*

*▪️साधा डिंक आणि मातीचा वापर करून चित्र रेखाटले*

*कासार्डे  ः संजय भोसले*

आपल्या कल्पक कलाकृतीतून नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि असामान्य कामगिरी करण्यात माहिर असलेल्या ध्येयवेढ्या व छंदवेढ्या अक्षय मेस्त्रीची किमया अनोळखी म्हणावी लागेल.साध्या डिकंचा वापर करून ड्राॅईग तयार केले आहे आणि त्यावरती माती टाकुन बाबासाहेब पुरंदरे यांची अप्रतिम चित्र कलाकृती साकारली आहे ती अक्षय मेस्त्री याने.स्व.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची अनोखी मानवंदना म्हणावी लागेल.

स्व.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची ओळख संपूर्ण देशवासीयांना तसेच जगाला करून देण्यासाठी खर्ची घातले.पण या महान व्यक्तीला संपूर्ण देश मुकला आहे.त्यांच्या जाण्याने एका थोर इतिहासकाराला आपण सर्वजण मुकलो आहोत.
त्यांची आठवण कायम आपल्या अंतरमनात रहावी यासाठी युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने अनोख्या रितीने त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे.यासाठी त्याने साध्या डिकंचा वापर करून ड्राॅईग तयार केले आहे…आणि त्यावरती माती टाकुन बाबासाहेब पुरंदरे यांची अप्रतिम चित्र कलाकृती साकारली आहे.

खेडे गावातील विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्यक्ष चित्रकलेचे धड मिळावेत तसेच त्यांच्यातून उत्तम चित्रकार घडावेत व नावारूपाला यावेत असाच प्रयत्न अक्षय मेस्त्रीचा नेहमीच असतो.खेडेगावातील विद्यार्थ्यांना साहित्य मिळत नाही किंवा उपलब्ध नसते. शिवाय मुलांच्या घरची परिस्थितीही खर्च करण्याची नसते.मग ते कलेकडे दुर्लक्ष करतात.त्यामुलांना चित्रकलेकडे ओढा वाढावा आणि त्यांना त्याचे योग्य मार्गदर्शन व धडे मिळणे गरजेचे असते.त्याची मुहूर्तमेढ अक्षयने आपल्या गवाणे गावात रोवली त्याची सुरुवात केली आहे.

त्यामुळे अगदी ग्रामीण भागातही उपलब्ध होणाऱ्या साहित्यामधून नाविन्यपूर्ण चित्र कसे तयार करता येईल? हे प्रात्यक्षिकाद्वारे गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याने दाखविले.या चित्राचे विशेष असे होते की, त्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अप्रतीम चित्र साकारले.
याच माध्यमातुन शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे याचं बोर्डवरती साध्या डिंक वापर करून व मातीच्या साह्याने चित्र रेखाटन केले. हे रेखाटन मुलांना कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले.हि कला ‌सहज करता येते हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला.यातून सुंदर कलाकृतीचा उगम होऊन स्व. बाबासाहेब पुरंदरे यांची सुंदर चित्रकूती साकारली गेली.याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!