*कोकण Express*
*▪️तत्कालिन आरोग्य सभापती अभिजीत मुसळे यांचा सत्कार!*
*▪️स्वच्छ सर्वेक्षण मध्ये यश मिळवल्याबद्दल केलेल्या कामाची दखल!*
*▪️नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलेली जबाबदारी पार पडल्याचे समाधान – मुसळे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायतीचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशातील पश्चिम विभागीय मधून 67 वा क्रमांक आल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आरोग्य सभापती ची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडल्या बद्दल तत्कालीन आरोग्य सभापती अभिजीत मुसळे यांचा कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलेली आरोग्य सभापती पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचे समाधान असल्याचे मत यावेळी श्री मुसळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, माजी नगरसेवक बंडू गांगण, नगरपंचायत चे ब्रँड ॲम्बेसिडर राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.