*कोकण Express*
*▪️छोटा हत्ती टेम्पोची दुचाकीला धडक*
*▪️महामार्गावरील अपघातात कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक दत्ता सापळे जखमी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोची धडक बसून कणकवलीतील जुने हॉटेल व्यवसायिक दत्ता सापळे हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावर हॉटेल नीलम कंट्री साईड जवळ झाला. दत्ता सापळे हे आपल्या दुचाकीने नीलमकंट्रीसाईड हॉटेलच्या मागील रस्त्यावरून महामार्ग क्रॉस करत होते. याच वेळी कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जाणारा छोटा हत्ती टेम्पोची त्यांना धडक बसली. यात सापळे हे टेम्पोच्या धडकेने दुचाकीसह डिव्हायडर वर जाऊन पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. अपघात घडताच तेथील ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना दुसऱ्या वाहनाने घरी पोहचवले.