*कोकण Express*
*डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोपः कळसुली आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू…*
*कणकवली तालुका वैदयकीय अधिकार्यांना ग्रामस्थांचा घेराव…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कळसुली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्यावर वेळेत उपचार न झाल्यामुळे हा प्रकार घडला असा, दावा त्या महिलेच्या नातेवाईकांकडुन करण्यात आला आहे. दरम्यान आपली डयूटी संपण्यापुर्वी डॉक्टर घरी गेले असा आरोप संतत्त नातेवाईक व ग्रामस्थांनी केला असून कणकवलीचे तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ यांना घेराव घालत संबधितांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
कळसुली गावात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याची ही तिसरी घटना आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे लोकांचा जीव जात असेल, तर वैद्यकीय सेवेचा आणि वैद्यकीय पेशाचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत नागरिक संतप्त झाले. या संतप्त नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांना घेराव घालत धारेवर धरले.
यावेळी सरपंच साक्षी परब, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, रुपेश आमडोस्कर, सुशांत दळवी, मधुकर चव्हाण, रुजाय फर्नांडिस, मोहन दळवी, विजय परब, नंदू परब, गुणाजी परब, सत्यवान परब, नंदकिशोर सुद्रीक आदींसह कळसुली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.