जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे प्रथम

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे प्रथम

*कोकण  Express*

*जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे प्रथम*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

उंबर्डे येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्म म्हणजे काय? आज प्रबोधनाची गरज’ या विषयावर विद्यार्थी गट, शिक्षक गट व खुला गट अशा तिन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. शिक्षक गटामध्ये अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.मंदार सदाशिव चोरगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील साधारण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. निवृत्त मुख्याध्यापक एस.पी.परब, केंद्रप्रमुख विजय केळकर, उपक्रमशील शिक्षक आर.के.बोबडे, अस्लम पाटणकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. उंबर्डेचे सुपुत्र अनंत सरवणकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी माध्यमिक विद्यालय उंबर्डे येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक शैलेंद्रकुमार परब, कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ दळवी ( उंबर्डे हायस्कूल संचालक)  माजी मुख्याध्यापक व सरपंच एस.एम. बोबडे, मुख्याध्यापक नादकर बी.एस, अध्यापक संघाचे अध्यक्ष शिंदे एस. बी., सरवणकर कुटुंबातील सदस्य मुंबईचे माजी पोलीस निरीक्षक संदिप सरवणकर, वैशाली सरवणकर तसेच उंबर्डे उपसरपंच दशरथ दळवी, चंद्रकांत दळवी, हुसेन लांजेकर, रज्जत रमदुल, धर्मरक्षीत जाधव, उंबर्डे हायस्कूल मुख्याध्यापक राठोड सर, तुळसणकर सर आदि मान्यवर व पारितोषिक विजेते स्पर्धक, प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!