नगरपंचायतीच्या अग्निशमन, सफाई कामगारांचा अनाम प्रेम संस्थेकडून सत्कार

नगरपंचायतीच्या अग्निशमन, सफाई कामगारांचा अनाम प्रेम संस्थेकडून सत्कार

*कोकण  Express*

*▪️नगरपंचायतीच्या अग्निशमन, सफाई कामगारांचा अनाम प्रेम संस्थेकडून सत्कार*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

अनाम प्रेम या भक्तिमार्गात कार्यरत असणाऱ्या संस्थेमार्फत गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून कणकवती नगरपंचायत मधीत अग्नीशमन व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध घटकांचे या संस्थेमार्फत नेहमीच कौतुक केले जाते. समाजात अनेक घटक आपआपल्यापरिने काम करत असतात. त्यामुळे या दुर्लक्षित राहिलेत्या घटकांचा गौरव व्हावा हा उदात्त हेतू ठेवून ही संस्था प्रसिद्धी च्या झोतात न राहता आपले काम करत असते. यापूर्वी देखील अनेकदा एसटी वाहक चालक यांच्यासोबतच पोस्ट डे, पोलीस डे, नर्स डे या संस्थेकडून कर्मचाऱ्यांचा गौरव करत साजरे केले जातात.

कणकवली नगरपंचायत मधीत अग्रीशमन व सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करताना अग्निशामन विभागाच्या टीम लीडर ला अग्निशमन विभागातील कामकाज व या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जुन्या अनुभवी लोकांचे अनुभव गाठीशी असावे त्याकरिता एक पुस्तकही भेट देण्यात आले. तसेच नरक चतुर्दशी दिवशी रेल्वेच्या मोटरमन यांनाही फराळ देऊन त्यांचा सत्कार या संस्थेमार्फत केला जातो. तसेच खंडेनवमी दिवशी रेल्वे रुळाची पूजा रेल्वे गॅंग मन यांचा सत्कार करून ही संस्था समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत असते. नुकतेच सीमेवर कार्यरत असणाऱ्या देशाचे रक्षण करणाच्या सैनिकांकरिता 16 हजार फराळाचे बोस या संस्थेच्या माध्यमातून पाठविण्यात आले.

यावेळी कणकवलीतील या संस्थेशी जोडले गेलेले नंदू टिकले, संदीप खानोलकर, अविनाश तिरोडकर नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक बंडू गांगण, मनोज धुमाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!