*कोकण Express*
*▪️मालोंड गडनदी जेटीचे २६ रोजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थित भूमिपूजन*
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत रस्ता व गडनदी तर जेटी भूमिपूजन समारंभ खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालोंड येथील चाळादेव येथे होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, रस्ता ठेकेदार आशिष परब, विनोद कन्स्ट्रक्शन जेटी ठेकेदार (राजापूर), मालोंड सरपंच वैशाली घाडीगावकर उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तरुण उत्कर्ष मंडळ, मालोड मुंबई व स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.