*कोकण Express*
*▪️सावंतवाडी नगरपरिषदेचा राज्यासह देशात डंका*
*▪️स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात ३२ वा, देशात २५५ वा क्रमांक;सुधीर आडिवरेकर यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये पश्चिम झोनमध्ये सावंतवाडी नगरपरिषदेने राज्यात 32 वा, तर देशात २५५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सावंतवाडी नगरपरिषदेन राज्यात 37 वा क्रमांक प्राप्त केला होता. यंदा एक पाऊल पुढे टाकण्यात नगर परिषद प्रशासनाला यश आले आहे. याबाबतची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी दिली आहे. या अभियानासाठी नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक, आरोग्य कर्मचारी, सफाई मित्र यांनी विशेष मेहनत घेतली होती.दरम्यान, नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा-२ अभियान अंतर्गत खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक नागरिकांनी न.प.कार्यालयात आपली नाव नोंदणी करावी अस आवाहन न.प .प्रशासन, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.