*कोकण Express*
*सांगवे येथील नाथा सावंत यांना मुतखडा ऑपरेशनसाठी सतीश सावंत यांनी केली आर्थिक मदत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील सांगवे केळीचीवाडी येथील नाथा सावंत यांच्या मुतखडा वरील ऑपरेशन खर्चासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आर्थिक मदत केली. त्यावेळी शामा सावंत, विजय सावंत, राजू पाटील, मुकेश सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोझा, गणेश शिवडावकर, मिलिंद बोभाटे, दादा सावंत, दिंगबर सावंत, रामा गुरव, दिनेश वाळके व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. नाथा सावंत यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे आभार मानले.