*कोकण Express*
*वैभववाडीतील राव फँमिली गार्डन रेस्टॉरंटचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ*
राव फँमिली गार्डन रेस्टॉरंटचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी शुभारंभ झाला. खवय्यांसाठी तालुक्यात नवी पर्वणी मिळाली आहे.
शिवसेना शहर प्रमुख प्रदीप रावराणे यांच्या मालकीचे असलेले “राव फँमिली गार्डन रेस्टॉरंट ” मंगळवार दि.१६ नोव्हेंबर सुरू झाले. मालवण -कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी या रेस्टॉरंटच उद्घाटन केले. यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत,संदेश पारकर, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके,प्रिया रावराणे, प्रसाद रावराणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या कित्येक दिवसांची खवय्यांची प्रतिक्षा असलेल्या या रेस्टॉरंटच मोठ्या दिमाखात ओपनिंग झाले.गडवाले कुक असलेल्या या रेस्टॉरंट इंडियन आणि पंजाबी फुड्स,स्पेशल तंदुर /कबाब,गोवन आणि मालवणी फिश थाळी व स्पेशल चायनीज फुड्स उपलब्ध आहे.तसेच बगीच्यामध्ये बसून जेवणाचा आस्वाद देखील घेता येणार आहे.वैभववाडीकरांसहीत जिल्ह्यातील खवय्यांसाठी ही एक प्रकारची पर्वणी ठरणार आहे.