*कोकण Express*
*माजगाव येथील दत्तमंदिराचे काम क-वर्ग पर्यटन निधीतून व्हावे…*
*आमदार दिपक केसरकर यांची जिल्हा नियोजनच्या बैठकीत मागणी….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजगाव येथील दत्तमंदिराचे काम क-वर्ग पर्यटन निधीतून घेण्यात यावे, अशी मागणी आमदार दिपक केसरकर यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. याबाबतची माहीती माजगावचे ग्रामस्थ तथा शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली आहे. माजगाव येथील दत्तमंदिर जीर्ण झाले आहे. त्यामुळे त्याचे नुतनीकरणाचे काम व्हावे, यासाठी तेथील ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू होते. ही मागणी ग्रामस्थांकडुन आमदार केसरकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत केसरकर यांनी ही मागणी केली आहे.