*कोकण Express*
*▪️कणकवलीतील २० नोव्हेंबरचा किलबिल जल्लोष रद्द!*
*▪️उपनगराध्यक्ष बंडू हर्णे; लवकरच या कार्यक्रमाची तारीख निश्चित केली जाणार!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात चिमुकल्यांसाठी २० नोव्हेंबर रोजी होणारा किलबिल जल्लोष हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्रींचे आज गुरुवारी निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. दरम्यान पुन्हा लवकरच या कार्यक्रमाची रूपरेषा व तारीख जाहीर केली जाईल, असेही श्री हर्णे यांनी सांगितले.
किलबिल जल्लोष हा कार्यक्रम रद्द करावा लागल्याने दिलगिरी व्यक्त करत असल्याचेही श्री हर्णे यांनी सांगितले. कणकवली शहरातील चिमुकल्यांसाठी किलबिल जल्लोष हा कार्यक्रम आनंदाची पर्वणी असतो. त्यामुळे पुन्हा नव्या स्वरूपात लवकर हा कार्यक्रम जाहीर करून लहान मुलांची व त्यांच्या पालकांची या कार्यक्रमाची असलेली उत्सुकता अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील असेही श्री हर्णे म्हणाले.