*कोकण Express*
*▪️शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई छ.शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी आमदार वैभव नाईक नतमस्तक*
*▪️स्मृतीदिनानिमित्त केले अभिवादन*
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत छ.शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी नतमस्तक होत त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत कणकवलीचे माजी नगरसेवक भूषण परुळेकर, पंढरीनाथ तावडे आदी उपस्थित होते.